अध्यात्म, योग आणि विज्ञान!

Image of Gautam Buddha in meditative state
Gautam Buddha in meditative state

अध्यात्म(Spirituality)

अध्यात्म ही एक व्यापक संकल्पना आहे, त्याचा अनुभव घेण्यासाठी बरेचशे दृष्टिकोन असू शकतात. सर्वसाधारणपणे, यात आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीशी संबंध जोडण्याची भावना असते आणि यात आपल्याला मिळालेल्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसा हा एक सार्वत्रिक (universal) मानवी अनुभव आहे — आपल्या सर्वांना स्पर्शून टाकणारा हा एक अनुभव आहे. लोक अध्यात्मिक अनुभवाचे वर्णन पवित्र किंवा अतींद्रिय/अलौकिक (transcendent) किंवा जिवंतपणा आणि एकमेकांशी सगळ्या जोडलेल्या गोष्टी म्हणून करतात.

अध्यात्माची भटकंती करायला निघालेल्या भटक्याला योग नावाचं साधन लागतं.

Image of Swami Vivekananda in meditative
Swami Vivekananda in meditative state

योग(Yoga)

योग हा संस्कृत शब्द असून त्याचे मूळ ‘युज्’ ह्या संस्कृत शब्दात आहे. युज् ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे दोन गोष्टींना एकमेकांमध्ये एकत्र जोडणे/एकत्र करणे/एकत्र जुंपणे (to attach, join, harness, yoke) असा होतो. योग म्हणजे मिलन, संगम, संयोग/एकरूप (Union) असा ह्याचा अर्थ होतो. आपल्यात आनंद आणि ज्ञान ह्यांना एकरूप करण्यासाठी, ‘मी’ला ‘आपण’मध्ये बदल्यांसाठी, आपल्यातल्या ऊर्जेला आपल्यापेक्षा मोठ्या ऊर्जेची संलग्न/एकत्र/एकरूप करणे अशा बऱ्याच गोष्टींना एकत्र करण्यासाठी योगचा सराव केला जातो . पण ह्यात एक मोठं वळण असं आहे की, ह्या सगळ्या गोष्टी आधी पासूनच एकरूप आहेत, विद्यमान आहेत फक्त आपल्याला त्याची माहिती नाही कारण आपण तितके जागृत(awake)/सावध(attentive)/दक्ष(alert)/जाणीव(aware) नाहीये. आपल्याला असलेल्या चेतनेची(conscious/consciousness) ह्या सगळ्याची जाणीव नाहीये. आणि ह्याचीच जाणीव करून देण्यासाठी आपण योगशास्त्रचा अभ्यास करतो आणि त्याचा सराव करतो. इतकी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून खूप जास्त इतिहास सांगत नाही, कारण माझ्यामते त्याचा इथे काही उपयोगही नाहीये.

Image of definition of yoga
Image of definition of yoga
Definition of Yoga

अष्टांग योग

योगच्या आठही अंगांचा योगच्या मोठ्या झाडाचा भाग म्हणून विचार करा. प्रत्येक अवयव झाडाच्या खोडाशी जोडला जातो, ह्या योग नावाच्या झाडाची वाढ आणि पोषण त्याच्या खोल, प्राचीन मुळांद्वारे केली जाते. प्रत्येक अंगात अशी पाने असतात जी अंगांचे जीवन दर्शवितात; ही पाने योगच्या अवयवांची तंत्रे आहेत. योगचे आठ अंग किंवा अवस्था ऋषी पतंजली ह्यांनी इ.स.पू. 300 ते 200 ह्या काळात लिखित ‘योगसूत्रां’च्या मजकूरात रेखाटली आहेत.

Image of Eight limbs of  Yoga
Eight limbs of Yoga
 • सत्य(truthfulness) — शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये सत्य असणं. परमसत्यात स्तिथ असणं.
 • अस्तेय(nonstealing) — शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये चोर प्रवृत्ती नसणं आणि चोरीची इच्छाही नसणं.
 • ब्रह्मचर्य(continence/moderation) — ब्रह्म ज्ञानामध्ये चैतन्य स्थिर करणे, सर्व इंद्रियामुळे मिळणाऱ्या सुखांवर आणि इंद्रियांवर संयम ठेवणे. लैंगिक आत्मसंयम.
 • अपरिग्रह(non-possessiveness) — मिळालेल्या द्रव्यापेक्षा जास्तीची अपेक्षा न करणं, दुसऱ्यांकडे असलेल्या गोष्टींची ईच्छा नसणं. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल त्यागाची भावना असणं.
 • संतोष(contentment) — संतुष्ट आणि प्रसन्न राहणं.
 • तप(austerity) — स्वतःशी शिस्तबध्द/अनुशासित असणं.
 • स्वाध्याय(self-study) — आत्मचिंतन करणं.
 • ईश्र्वर-प्रणिधान(surrender to a higher power/energy) — ईश्वराला पूर्णपणे समर्पित केलेलं असणं, देवावर पूर्ण श्रद्धा असणं.

हठयोग(Hathayoga)

हठयोग हा सामान्यतः आधुनिक (आणि विशेषतः पाश्चात्य) समाजात वापरला जाणारा प्रकार आहे. हठ हा शब्द सामान्यत: संस्कृत मधून "सूर्य आणि चंद्र" म्हणून अनुवादित केला जातो, ज्यात ‘ह’(ha) सूर्याची ऊर्जा दर्शवितो आणि ‘ठ’(tha) चंद्राची ऊर्जा दर्शवितो. सूर्याची सक्रिय उर्जा आणि चंद्राची शीतल उर्जा ह्यांच्यात समतोल साधने हे हठयोग अभ्यासाचे अंतिम लक्ष्य आहे. हठ ह्या शब्दाचे भाषांतर “जबरदस्ती”(forceful) म्हणून देखील केला गेला आहे, आणि ‘हठ योग प्रदिपिका’ ह्या पुस्तकामध्ये त्याचा समाविष्ट केलेले आहे. काही अनुभवी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की हा अनुवाद योग्य आहे कारण हठयोगसाठी बऱ्याच शारीरिक प्रयत्नांची आवश्यकता असते. प्रतीकात्मक तसेच शारिरीक पातळीवरही हठ म्हणजे उर्जा किंवा शक्ती यांचे संतुलन होय.

Image of Yoga hierarchy
Tree of Yoga Hierarchy

विज्ञान(Science)

बरेचसे लोकं समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीत किती उर्जा आहे हे कळायला अपयशी ठरतात. कोणत्याही अणूचे केंद्र हे तीव्र उत्सर्जित किरणांची(radiation) भट्टी असते आणि जेव्हा आपण भट्टीचा दरवाजा उघडतो तेव्हा ती ऊर्जा बाहेर पडते; अनेकदा हिंसक स्वरूपात. तरीदेखील, या गोष्टीच्या बाबतीत आणखीन एक वेगळी गोष्ट आहे जी शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे आपल्यापासून पळवली.

E=mc²

वर दिसू शकणारे सोपे बीजगणित सूत्र पदार्थाच्या संबंधित उर्जेचे परस्परसंबंध दर्शविते (energy equivalence of any given amount of mass). बऱ्याच लोकांनी हे ऐकले आहे पण बऱ्याच लोकांना हे समजत नाही. बर्‍याच लोकांना पदार्थांमधे किती उर्जा असते याची माहिती नसते. तर, पुढील काही मिनिटांसाठी, मी आपल्या स्वतःत असलेल्या वैयक्तिक संभाव्य ऊर्जेच्या समतेची विशालता(magnitude of your own personal potential energy equivalence) आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

Image of Albert
Image of Albert
Albert Einstein

निष्कर्ष(Conclusion)

आपलं शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पाच तत्वांनी बनलं आहे, ज्याला आपण पंचमहाभूते असंही म्हणतो. ते खालील प्रमाणे:

 1. आप (जल) — आप म्हणजे पाणी, जल. जलामुळे शरीराला तरलता मिळते. शरीरात रक्त, निरनिराळी संप्रेरकं, पाणी यासारखे अनेक द्रव्य पदार्थ वाहत असतात. अन्नातून मिळणारी ऊर्जा आणि पोषक घटक एका जागी साचू न देता संपूर्ण शरीरभर पोहोचवण्याचं काम ही द्रव्ये नेटाने पार पाडतात. आयुर्वेदात याच द्रव्यांना 'कफ' म्हटलं जातं. कफामधलं असंतुलन आजारी शरीराचं लक्षण आहे.
 2. तेज (अग्नी) — तेज म्हणजे अग्नि. शरीरातील ऊर्जा, उष्णता हे या अग्निचंच प्रतिक! शिवाय, शरीराला एक विशिष्ट तापमानही असतं. आयुर्वेदी हाच अग्नी शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करतो असं मानतात. 'पित्त' या संज्ञेने आयुर्वेदाचार्य त्याचा उल्लेख करतात. निरोगी शरीरासाठी शरीराचं तापमान आणि उष्णता या दोन गोष्टी संतुलित असणं गरजेचं असतं.
 3. वायू वायू म्हणजे शरीराचा प्राण. अगदी सोपं करून सांगायचं तर आपण श्वाच्छोश्वास करतो म्हणजेच शरीरात वायू तत्त्वाचा वावर असतो. श्वासावाटे ऑक्सीजन शरीरात प्रवेश करतो हे तर सर्वज्ञात आहे. ऑक्सीजनलाच 'प्राण’वायू असं म्हणतात. वायु तत्त्वामुळे शरीरात ऑक्सीजन शिवायही अनेक वायू आणि उपवायू संचार करत असतात. या सगळ्याची एकत्रित माहिती 'पतंजली योगसुत्रां’त मिळते. आयुर्वेदात यासाठी 'वात' ही संज्ञा वापरली जाते.
 4. आकाश — पंचमहाभूतांपैकी आकाश हे एकमेव तत्त्व अभौतिक आहे. आकाशाची तुलना मानवी मनाशी केली जाते. आकाशाप्रमाणेच मन अनंत असतं, कोणत्याही बंधनांमध्ये मनाला बांधता येत नाही. आकाश अनंत उर्जेनं तर मन अनंत शक्तींनी भरलेलं आहे. आकाश कधी दाटून येतं, कधी निरभ्र होतं तर कधी तळपत्या सूर्याला जागा करून देतं. मनही कधी प्रसन्न होतं तर कधी दुःखी होत. कधी आशेवर जगतं तर कधी निराश होतं. कधी सागरातील लाटांसारखं क्रोधाने उफाळून येतं तर कधी आकाशासारखंच मन शांत होतं. या पंचमहाभूतांवर नियंत्रण ठेवणारं आणखी एक तत्त्व अस्तित्त्वात असतं - 'आत्मा’. माणूस जीवंत असेपर्यंत त्याच्यातील चेतना, त्याचा आत्मा जागरूक असतो. अगदी झोपेतही कधी कधी ही चेतना काम करते. ही चेतना संपूर्ण शरीराचं नियंत्रण करते.

आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असलेली ऊर्जा किंवा चेतना (human consciousness) ही वैश्विक ऊर्जेत किंवा चेतनेत (cosmic consciousness) एकरूप होणं ह्याचा जीवित असताना ज्याला अनुभव येतो त्याला आपण आत्मज्ञान/प्रबुद्ध (enlightenment/enlightened) किंवा मोक्ष/मुक्ती (liberation/liberated) असं म्हणतो. हेच ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मसत्य होय!

© Abhishek Katyare

Seeker of truth, who is on the path to becoming a mystic.

Seeker of truth, who is on the path to becoming a mystic.