अध्यात्म, योग आणि विज्ञान!

Image of Gautam Buddha in meditative state
Gautam Buddha in meditative state

अध्यात्म(Spirituality)

अध्यात्माची भटकंती करायला निघालेल्या भटक्याला योग नावाचं साधन लागतं.

Image of Swami Vivekananda in meditative
Swami Vivekananda in meditative state

योग(Yoga)

Image of definition of yoga
Definition of Yoga

अष्टांग योग

Image of Eight limbs of  Yoga
Eight limbs of Yoga
 • अहिंसा(non-violence) — शब्दांनी, विचारांनी आणि कृतीने दुसऱ्या कोणत्याही जीवाला हानी न करणं आणि मनात तशी इच्छाही नसणं.
 • सत्य(truthfulness) — शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये सत्य असणं. परमसत्यात स्तिथ असणं.
 • अस्तेय(nonstealing) — शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये चोर प्रवृत्ती नसणं आणि चोरीची इच्छाही नसणं.
 • ब्रह्मचर्य(continence/moderation) — ब्रह्म ज्ञानामध्ये चैतन्य स्थिर करणे, सर्व इंद्रियामुळे मिळणाऱ्या सुखांवर आणि इंद्रियांवर संयम ठेवणे. लैंगिक आत्मसंयम.
 • अपरिग्रह(non-possessiveness) — मिळालेल्या द्रव्यापेक्षा जास्तीची अपेक्षा न करणं, दुसऱ्यांकडे असलेल्या गोष्टींची ईच्छा नसणं. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल त्यागाची भावना असणं.
 • शौच(cleanliness) — शरीर आणि मन शुद्ध असणं.
 • संतोष(contentment) — संतुष्ट आणि प्रसन्न राहणं.
 • तप(austerity) — स्वतःशी शिस्तबध्द/अनुशासित असणं.
 • स्वाध्याय(self-study) — आत्मचिंतन करणं.
 • ईश्र्वर-प्रणिधान(surrender to a higher power/energy) — ईश्वराला पूर्णपणे समर्पित केलेलं असणं, देवावर पूर्ण श्रद्धा असणं.

हठयोग(Hathayoga)

Image of Yoga hierarchy
Tree of Yoga Hierarchy

विज्ञान(Science)

E=mc²

Image of Albert
Albert Einstein

निष्कर्ष(Conclusion)

 1. पृथ्वी — पृथ्वी म्हणजे भौतिकता. पृथ्वीमुळे शरीराला जडत्व येतं. मानवी शरीर डोळ्यांना दिसतं, कानांनी त्याचा आवाज ऐकू येतो, शरीराला विशिष्ट गंध असतो, त्याला स्पर्शही करता येतो. शरीराचं हे इंद्रियाधारीत ज्ञान पृथ्वी या महाभूताकडून मिळालेल्या जडत्वामुळे शक्य होतं. ज्या धातू आणि अधातूंच्या कणांनी पृथ्वी तत्त्व निर्माण होतं त्याच कणांनी माणसाचं भौतिक शरीर बनलेलं असतं. यामुळेच, शरीराला निरोगी आणि बलशाली बनवण्यासाठी आयुर्वेदात धातूंच्या राखेचा उपयोग केला जातो.
 2. आप (जल) — आप म्हणजे पाणी, जल. जलामुळे शरीराला तरलता मिळते. शरीरात रक्त, निरनिराळी संप्रेरकं, पाणी यासारखे अनेक द्रव्य पदार्थ वाहत असतात. अन्नातून मिळणारी ऊर्जा आणि पोषक घटक एका जागी साचू न देता संपूर्ण शरीरभर पोहोचवण्याचं काम ही द्रव्ये नेटाने पार पाडतात. आयुर्वेदात याच द्रव्यांना 'कफ' म्हटलं जातं. कफामधलं असंतुलन आजारी शरीराचं लक्षण आहे.
 3. तेज (अग्नी) — तेज म्हणजे अग्नि. शरीरातील ऊर्जा, उष्णता हे या अग्निचंच प्रतिक! शिवाय, शरीराला एक विशिष्ट तापमानही असतं. आयुर्वेदी हाच अग्नी शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करतो असं मानतात. 'पित्त' या संज्ञेने आयुर्वेदाचार्य त्याचा उल्लेख करतात. निरोगी शरीरासाठी शरीराचं तापमान आणि उष्णता या दोन गोष्टी संतुलित असणं गरजेचं असतं.
 4. वायू वायू म्हणजे शरीराचा प्राण. अगदी सोपं करून सांगायचं तर आपण श्वाच्छोश्वास करतो म्हणजेच शरीरात वायू तत्त्वाचा वावर असतो. श्वासावाटे ऑक्सीजन शरीरात प्रवेश करतो हे तर सर्वज्ञात आहे. ऑक्सीजनलाच 'प्राण’वायू असं म्हणतात. वायु तत्त्वामुळे शरीरात ऑक्सीजन शिवायही अनेक वायू आणि उपवायू संचार करत असतात. या सगळ्याची एकत्रित माहिती 'पतंजली योगसुत्रां’त मिळते. आयुर्वेदात यासाठी 'वात' ही संज्ञा वापरली जाते.
 5. आकाश — पंचमहाभूतांपैकी आकाश हे एकमेव तत्त्व अभौतिक आहे. आकाशाची तुलना मानवी मनाशी केली जाते. आकाशाप्रमाणेच मन अनंत असतं, कोणत्याही बंधनांमध्ये मनाला बांधता येत नाही. आकाश अनंत उर्जेनं तर मन अनंत शक्तींनी भरलेलं आहे. आकाश कधी दाटून येतं, कधी निरभ्र होतं तर कधी तळपत्या सूर्याला जागा करून देतं. मनही कधी प्रसन्न होतं तर कधी दुःखी होत. कधी आशेवर जगतं तर कधी निराश होतं. कधी सागरातील लाटांसारखं क्रोधाने उफाळून येतं तर कधी आकाशासारखंच मन शांत होतं. या पंचमहाभूतांवर नियंत्रण ठेवणारं आणखी एक तत्त्व अस्तित्त्वात असतं - 'आत्मा’. माणूस जीवंत असेपर्यंत त्याच्यातील चेतना, त्याचा आत्मा जागरूक असतो. अगदी झोपेतही कधी कधी ही चेतना काम करते. ही चेतना संपूर्ण शरीराचं नियंत्रण करते.

आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असलेली ऊर्जा किंवा चेतना (human consciousness) ही वैश्विक ऊर्जेत किंवा चेतनेत (cosmic consciousness) एकरूप होणं ह्याचा जीवित असताना ज्याला अनुभव येतो त्याला आपण आत्मज्ञान/प्रबुद्ध (enlightenment/enlightened) किंवा मोक्ष/मुक्ती (liberation/liberated) असं म्हणतो. हेच ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मसत्य होय!

--

--

Seeker of truth, who is on the path to becoming a mystic.

Get the Medium app

A button that says 'Download on the App Store', and if clicked it will lead you to the iOS App store
A button that says 'Get it on, Google Play', and if clicked it will lead you to the Google Play store