कृतज्ञता

आजची तरुणाई पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, आणि प्रतिष्ठेसाठी झगडतेय. वरच्या तीनही गोष्टी क्षणभंगुर आहेत. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान सुद्धा क्षणिक आहे. त्यापेक्षा त्यांनी स्वतःला काही प्रश्न केले पाहिजे, “आपण कृतज्ञ आहोत का? आपल्या हृदयात कृतज्ञतेचा भाव आहे का? आपण कृतज्ञता व्यक्त करतो का?” ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधून काढायला पाहिजे. जर ह्या प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ असं असेल, तर त्यांनी कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या हृदयात कृतज्ञतेचे बीज रोवले पाहिजे. एखादी व्यक्ती कृतज्ञ आहे, पण ती व्यक्ती जर कृतज्ञता व्यक्त करत नसेल, तर ती व्यक्ती कृतज्ञ असून सुद्धा आनंद उपभोगू शकत नाही. कृतज्ञता फक्त हृदयात असून चालणार नाही, तर ती शब्दात, वृत्तीत आणि वर्तणुकीत व्यक्त केली गेली पाहिजे. तेंव्हाच आजची तरुण पिढी शाश्वत आनंद अनुभवू शकते.

कृतज्ञता
कृतज्ञता